मसाला आरवी

   चटपटीत मसाला आरवी 

साहित्य :-

आरवी पाव किलो, धना जीरा पावडर 2चमचे, आमचूर पावडर 1 चमचा, हळद, जिरे, मोहरी प्रत्येकी 1 चमचा, आल कीसुन 1 चमचा, गरम मसाला , किचन किंग मसाला, तळण्यासाठी तेल, कोथिंबीर चिरलेली 1मोठा चमचा.

कृती :-

आरवी स्वच्छ धुवुन घ्यावी, मग उकडुन घ्यावी, त्यानंतर त्याची सालं काढुन त्याचे काप करून घ्यावे, कढईत तेल गरम करून त्यात ते तळून घ्यावे, मग दुसऱ्या कढईत एक चमचा तेल गरम करून गॅस बारीक करा आणि मोहरी, जिरे, धने पुड जिरे पुड, गरम मसाला, किचन किंग मसाला, मीठ घालुन छान परतुन घ्यावे, त्यात थोडे पाणी शिंपडावेआणि गॅस बंद करावा.तो पर्यंत आरवी थंड होईल तीला पुन्हा एकदा गरम तेलात कुरकुरी होईल ईतकी तळून तयार केलेल्या मसाल्यांमधे घालुन मिक्स करून घ्या.आणि सर्व्ह करा.नाश्ता किंवा पोळी ,पराठा या बरोबर छान लागतो.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *