दडपे पोहे

दडपे पोहे / Dadpe Pohe

साहित्य :-

पातळ पोहे 2 वाटी, एक काकडी कीसुन, गाजर अर्धी वाटी कीसुन, ओल खोबरे 1वाटी खवलेले, टोमॅटो बारीक चिरून कोथिंबीर 1/2 वाटी बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक चिरून, एक मोठा बारीक चिरलेला कांदा,कड़ी पत्ता, मोहरी, जिरे, हिंग, हळद ,आणि शेंगदाणे,2 मोठे चमचे तेल.

कृती :-

एका मोठ्या भांड्यात पातळ पोहे घ्या त्याच्यावर किसलेले काकडी, गाजर, टोमॅटो बारीक चिरून, कोथिंबीर, खवलेल्या नारळ, हे सगळं मिक्स करून कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळून पोह्या वर घालुन घ्या. मग कढईत उरलेल्या तेलात मोहरी हिंग हळद कड़ी पत्ता कांदा घालुन छान परतुन घ्या. हा परतलेला कांदा पोह्या वर घालुन सगळे पोहे मिक्स करून घ्या. आणि कोणत्याही पापडा बरोबर खायला द्या.


Dadpe Pohe
Dadpe Pohe

Dadpe Pohe
Dadpe Pohe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *